बदनापूर
बदनापूर जवळील गायरान जमीन गट नंबर १८९ मधील दलित ,आदिवासी गोर गरीब मागील चाळीस वर्षांपासून गायरान जमिनीवर वहितीकरून कुटुंबाची उपजीविका भागवीत असतांना बदनापूर नगर पंचायत अधिकारी,पदाधिकाऱ्यांनी या जागेवर घाण कचरा प्रकल्प राबविण्यास सुरवात केल्याने गायरान जमीन धारक अडचणीत आल्याने साखळी उपोषण सुरु करण्यात आले मात्र एकही अधिकाऱ्याला या गरिबांची काळजी घ्यायला वेळ नसून दहावा दिवस उलटला तरी जिल्हाधिकाऱ्यासह सर्वच अधिकारी डोळेझाक करीत आहे दरम्यान बदनापूरचे आमदार तथा भाजप जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांनी दखल घेत ४२ गायरानधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन विशेष मागणी केली असता महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सात दिवसात प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
बदनापूर शिवारातील गट नंबर १८९ मधील गायरान जमिनीवर मागील ४० वर्षांपासून शहरातील गोर गरीब दलित समाजातील ४२ कुटुंब वहिती करून कुटुंबाची उपजीविका भागवीत आहे , १९७८ पासून वहिती करीत असल्याने या कुटुंबावर गुन्हे देखील नोंद झालेले आहे ,शासनाच्या नियमानुसार १९७८ मध्ये गायरान जमिनीवर वहितीकरणाऱ्या कुटुंबांना गायरान नियमानुकूल करून देण्याचे आदेश असतांना देखील या कुटुंबावर काही अधिकाऱ्यांनी अन्याय करीत गायरान जमीन नावावर करून दिलेली नाही ,२०२१ मध्ये गायरान जमिनीवर नगर पंचायत ने दावा केल्यानंतर राहुल चाबुकस्वार यांनी विरोध केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे सदरील गायरान जमीन प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना देखील सदर गायरान जमिनीची रजिस्ट्री नगर पंचायतच्या नावाने करण्याचे आदेश काही अधिकाऱ्यांनी काढले व नगर पंचायतच्या नावे रजिस्ट्री देखील करण्यात आली ,

विशेष म्हणजे रजिस्ट्री मध्ये जोडलेल्या अटी नियमानुसार ११ क्रमांकाच्या मुद्द्याचे अवलोकन केले असता सदरील गट नम्बर १८९ मध्ये कोणी दावा केल्यास किंवा प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यास सदर आदेश रद्द समजला जाईल असे नमूद असतांना व प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना देखील सदर जमीन नगर पंचायतच्या नावे करण्याची घाई महसूल अधिकाऱ्यांनी का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान बदनापूर नगर पंचायत सदर गायरान जमिनीवर शहरातील घाण टाकण्यास सुरवात केल्याने गायरान जमीनधारकांनी मागील दहा दिवसापासून साखळी उपोषण सुरु केलेले आहे मात्र अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यानी केला आहे.
दरम्यान बदनापूर अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जालना जिल्हा भाजप अध्यक्ष नारायण कुचे यांनी उपोषणाची दखल घेतली असून बदनापूर गायरान जमीन गट नंबर १८ मधील ४२ कुटुंबाच्या नावे नियमानुसार गायरान जमीन नियमानुकूल करून देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन सादरही २ कुटुंब भूमिहीन कामगार असून त्यांच्याकडे उपजीविका भागविण्यासाठी गायरान जमीन व्यतिरिक्त कोणतेही साधन नाही ,१९७८ पासून सदरील ४२ कुटुंब सदर गायरान जमीन नियमानुकूल करण्याची मागणी करीत आहे तरी आपण सदरील ४२ कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी केली व सदर पत्र सामाजिक कार्यकर्ते रवी वाहूळ यांच्या शिष्ट मांडले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंबई येथे भेट देऊन दिले असता महसूलमंत्र्यांनी सात दिवसात सदर प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

