कर्नाटकातील येल्लापुरा येथे एक ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले असून सदर घटना बुधवारी सकाळी घडली. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुर्त्यू पावलेल्या कुटुंबाना भरपाईची घोषणा केली आहे.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे २२ जानेवारी रोजी सकाळी एक मोठा अपघात झाला. फळे आणि भाज्या घेऊन जाणारा एक ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळला असून या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे ,सावनूर-हुबळी महामार्गावर पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. स्थानिक लोक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.राज्यचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मदतीची घोषणा केली आहे.

