बदनापूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जालना दौऱ्यावर असतांना त्यांनी बदनापूर येथील आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालयाला भेट दिली तेव्हा निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेतली असता तुम्ही लाडक्या बहिणी आहेत निश्चितपणे पुढच्या वेळी तुमच्या कॅम्पस ला भेट देईन असे म्हणत विद्यार्थिनी सोबत अभ्यासाविषयी आस्थेवाईकपणे विचारणा करून तुम्ही चांगला अभ्यास करा आणि देशाचे भविष्य घडवा अशी सूचना केली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी अजित पवार यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार जालना दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याकडे आयोजित स्वागत कार्यक्रमासाठी थांबले असता निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी अजित पवार यांची भेट घेऊन आमच्या कॅम्पस ला भेट देण्याची विंनती केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थिनी सोबत तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहेत तुमच्यासाठी तुमचा हा भाऊ कायम सोबत आहे,नक्कीच पुढच्या वेळी तुमच्या कॅम्पस ला भेट देईन असे म्हणत तुमचा अभ्यास कसा चालला ,चांगला अभ्यास करा ,देशाला तुमची गरज आहे,देशाचे भवितव्य आहेत असे सांगितले.
यावेळी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी स्वागत केले,संस्थेचे संचालक डॉ.एस.एस.शेख ,इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.सुनील जायभाये, डॉ.शरफोद्दीन शेख,प्रभारी प्राचार्य डॉ.झेड ए पठाण ,डॉ.अशोक मुंढे,डॉ.देवेंद्र देशमुख आदी उपस्थित हो



