बठाण बुद्रुक येथे ‘पालावरची दिवाळी – एक दिवा वंचितांसाठी’ भाजपा तर्फे उपक्रम उत्साहात साजरा

जालना | प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी,जालना महानगरच्या वतीने मौजे बठाण बुद्रुक येथे ऊसतोड कामगार बांधवांसोबत ‘पालावरची दिवाळी – एक दिवा वंचितांसाठी’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.दीपावलीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि कष्टकरी बांधवांचीही दिवाळी आनंददायी व्हावी, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊसतोड कामगार बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.आपल्या कुटुंबापासून दूर राहून ऊन, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र कष्ट करणाऱ्या श्रमिक बांधवांच्या जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. यावेळी कामगार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून मनाला विशेष आनंद झाला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचवणे, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि प्रत्येकाप्रती सामाजिक बांधिलकी जपणे, हीच खऱ्या अर्थाने दिवाळीची खरी गोडी आहे.याप्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केळकर,गटनेते महेश निकम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने,सरपंच ज्ञानेश्वर देवडे, दत्तू नाना बागल, नानासाहेब देवडे, बळीराम शिंदे, जिल्हा सरचिटणीस वसंत शिंदे, सुनील पवार, शिवप्रकाश चितळकर, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, राजाराम जाधव, गजानन खरात, विष्णू डोंगरे, कृष्णा गायके, शिवाजी गवारे, मदन गवारे, नागेश अंभोरे, दिगंबर गोल्डे, कुंडलिक जिजा देवडे, उद्धव ढवळे, विष्णू ढगे, सागर वाहूळकर, सुधाकर शिंदे, गणेश बागल, कडूबा जिजा देवडे, विठ्ठल बागल, सचिन बागल, सिद्धेश्वर देवडे, विनोद बागल, गजेंद्र बागल, गणेश देवडे, विश्वंभर देवडे, वैभव देवडे, प्रशांत उबाळे, परमेश्वर देवडे, चैतन्य देवडे, राजू देवडे, रामनाथ देवडे, नवनाथ सिरसाठ, भाऊसाहेब गोल्डे, रवी जगधने, बाबुराव बागल, सुभाष बागल यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
