महाराष्ट्र

गेवराईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; तीन जण गंभीर जखमी

गेवराई, जिल्हा बीड / शैफ शेख

शहरातील संजय नगर भागात गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.बंजारा क्रांती दलाचे नेते लक्ष्मण चव्हाण यांच्या राहत्या घरी हा स्फोट झाला. जखमींमध्ये त्यांची पत्नी स्वर्णा लक्ष्मण चव्हाण, बहीण जनाबाई राठोड आणि भाचा अमोल राठोड यांचा समावेश आहे.संजय नगर या दाटीवाटीच्या वस्तीत स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटानंतर घराला भीषण आग लागली. जखमींवर गेवराई येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. त्यातील दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक शाहरुख पठाण आणि भाजपाचे नेते शिवराज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक जीवितहानी होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने आग विझवली.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button