सामाजिक

आमदार विलास भूमरे प्रतिष्ठानकडून अनाथ मुलांना दिवाळीची भेट; ३० चिमुकल्यांना नवीन कपडे

पैठण (स्वाती बंडू वाघ ) –

दिवाळी म्हटले की प्रत्येक घरात नवीन कपडे, फराळ आणि आनंदाची लगबग सुरू होते. मात्र आई-वडिलांच्या मायेपासून वंचित असलेल्या अनाथालयातील चिमुकल्यांसाठी हा आनंद अनेकदा काहीसा वेगळा असतो. याच मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा खरा आनंद फुलवण्यासाठी आमदार विलास भूमरे प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथाश्रमातील ३० मुलांसाठी पैठण शहरातून आवडीचे कपडे खरेदी करण्यात आले. केवळ कपडेच नव्हे, तर प्रत्येक मुलाच्या आवडीनुसार कपड्यांची खरेदी करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला.खासदार संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा अनाथ मुलांसाठी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला होता.या वेळी आमदार विलास भुमरे यांनी स्वतः चिमुकल्या मुलांशी आपुलकीने संवाद साधला. सणासुदीच्या काळात गजबजलेल्या बाजारात इतर मुलांसोबत खरेदीचा आनंद घेताना या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हीच खरी दिवाळी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर दांडगे, कविता शिंदे, वैशाली रविखर, आशिष गिरे, आप्पासाहेब निर्मळ, विनोद बोंबले, शेखर शिंदे, ऋषिकेश दहिफळे, भारत काराडे, परशेती, जयश्री गायकवाड, भारती मिसाळ, राजू गायकवाड, जावेद मिसाळ, अजित पगारे, राज मानकर, महेश गाडे, रविंद्र क्षीरसागर, मनीष ओटे, गिरीश खंडागळे, गणेश वायभासे, प्रीतम अडसूळ, रशीद शेख, जॉनसिंग बेलदार, अनाथालयाचे संचालक रामेश्वर गोरडे, हेमलता गोरडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button