महाराष्ट्र

फलटणमधील स्वीकृत नगरसेवकांचा काळूबाई मंदिरात शपथनाट्य

बड्या पक्षाचा नवा फंडा : अंधश्रद्धा की स्वतःच्याच नगरसेवकांवर अविश्वास?

फलटण /अमीर शेख

फलटण नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांनी वेळेत राजीनामा द्यावा, यासाठी थेट सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध काळूबाई मंदिरात नेऊन शपथ घ्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकीय नैतिकता, पक्षशिस्त आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास नसल्यामुळेच हा शपथनाट्याचा प्रयोग करण्यात आला का? असा थेट सवाल आता नागरिक करत आहेत.

शपथ… पण का ?

ज्या नगरसेवकांवर पक्षाला स्वतःचा शब्द, लेखी करार किंवा राजकीय परंपरेवर विश्वास ठेवता येत नाही, त्यांच्याकडून देवाच्या नावावर शपथ घ्यावी लागते, हे चित्र लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे. “मी वेळेत राजीनामा देईन”अशी शपथ देवासमोर घेतली जाते, पण पक्षाच्या शब्दाची किंमत शून्य झाली आहे का?

नगरसेवकांवर पक्षालाच विश्वास नाही का?

अंधश्रद्धेचा राजकारणात शिरकाव ? आज संविधानाची शपथ घेणारे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यवहारासाठी मंदिरात शपथ घेत असतील, तर हा अंधश्रद्धेचा कळस नाही का? राजकीय निर्णय हे कायदे, नियम आणि लोकशाही प्रक्रियेतून व्हायला हवेत;
देवाच्या नावावर दबाव टाकून नाही.

नागरिकांचा संताप

फलटणमधील नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी आहे. “पक्षाला स्वतःच्या लोकांवर विश्वास नसेल, तर शहराचा कारभार कसा करणार?”
असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शपथनाट्याचा प्रकार म्हणजे राजकीय अपयशाची कबुली नाही का? देवाच्या नावावर राजकारण करून देवाचा आणि लोकशाहीचा अपमान केला जात नाही ना? उद्या शपथ मोडली तर जबाबदारी कोणाची?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button